कर्जत चारफाटा येथे ट्रकची विजेच्या खांबाला धडक

07 Dec 2024 15:44:12
 KARJT
 
कर्जत | चारफाटा येथे बुधवारी रात्री निकिता इंटरप्राइजेसची टाटा कंपनीची हायवा गाडी तेथील विजेच्या खांबाला धडकली. त्यावेळी प्रचंड आवाजाचा होऊन स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. स्थानिकांनी त्या भागातील वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर कर्जत नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने तेथे पोहचून आग वेळीच नियंत्रणात आणली. कर्जतमधील निकिता इंटरप्राइजेस या फर्मचा टाटा कंपनीचा हायवा एम एच ४६ एआर ३२५४ हा ट्रक कर्जत शहराच्या दिशेने जात होता.
 
त्यावेळी चालकाच्या चुकीमुळे ट्रकचा लोफ्ट वरच राहिला आणि तो लोफ्ट उंचीवर राहिला. त्यामुळे त्या हायवा ट्रकचा लागलेली धडक हि रेल्वेकडे वीज वाहून नेणार्‍या ११० केव्हीए क्षमतेच्या खांबाला धडकला होता. ट्रेकला लागलेली ही धडक यामुळे त्या वीज वाहिनीमधून निघालेली आग यामुळे लाईनला ट्रकने अचानक पेट घेतला.
 
त्यावेळी ट्रकच्या चालकाला विजेचा धक्का बसल्याने त्याने तत्काळ गाडीतून उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. त्याचवेळी त्या भागातून कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे हे जात होते. त्यांनी तात्काळ कर्जत चारफाटा येथील चारही रस्त्यावरील वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला. तर लगेच कर्जत पालिकेच्या अग्निशमन यंत्रणा आणि कर्जत पोलीस यांना कळविण्यात आल्याने काहीवेळातच अग्निशमन बंब तेथे पोहचला. महावितरणने त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित केल्याने देखील मोठा अनर्थ टळला आहे.
Powered By Sangraha 9.0