फूडकोर्टमध्ये कंटेनर घुसला; कामगाराचा मृत्यू

09 Dec 2024 19:20:14
 khopoli
 
खोपोली । मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी संध्याकाळी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजगावजवळ एका हॉटेलमध्ये कंटेनर घुसून झालेल्या अपघातात हॉटेलमध्ये काम करणार्‍या कामगाराचा मृत्यू झाला.दैव बलवत्तर म्हणून हॉटेलमधील अनेकांचे प्राण वाचले. पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेला कंटेनर चार कारना धडक देवून साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या फूडकोर्टमध्ये घुसला.
 
यात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलमध्ये असलेले अन्य कामगार आणि ग्राहकांनी वेळीच पळ काढल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात हॉटेल आणि कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील सर्व प्रवासीही सुखरूप आहेत. पुणे मार्गावर उभारण्यात आलेले फूडकोर्ट हे हॉटेल अनधिकृत असल्याची माहिती असून राजाश्रय असल्याने तीव्र उतारावर असलेले हे धोकादायक हॉटेल चालवण्यात येत असून हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिकाकंडून केला जातोय.
Powered By Sangraha 9.0