सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक ; पनवेल शहरासह 6 ठिकाणचे गुन्हे उघडकीस

By Raigad Times    30-Mar-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल । विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्‍या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी केली अटक केली आहे. त्याच्याकडून जिवंत काडतुसांसह सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पनवेल शहरासह 6 ठिकाणचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
 
राम उर्फ शिवा फुलचंद कनोजीया (वय 43, रा.अमर म्हात्रे चाळ, रुम नं.1, देसलेपाडा,डोंबिवली पुर्व) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.त्याला गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेत, त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 2 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राम कनोजीया विरोधात पनवेल शहरासह मानपाडा, डोंबिवली, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत.