जिल्ह्यात २ हजार ७०४ कोटीच्या कामांना मंजूरी ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन

07 Mar 2024 17:28:18
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २ हजार ७०४ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते दृरदूष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील १४ कामांचे लोकार्पण तर ४८ कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
 
समिती सभागृह विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे आयोजित या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आ.प्रवीण दरेकर, आ.निरंजन डावखरे (ऑनलाईन) उपस्थित होते. तर कार्यक्रम स्थळी मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण मुंबई शरद राजभोज आणि अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील मंजूरी मिळालेली सर्व कामे उत्कृष्ट व दर्जेदार होतील याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले पाहिजे. कामांचा दर्जा चांगल्या पध्दतीचा असावा यासासाठी सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे.
 
रायगड जिल्ह्याचे पर्यटनदृष्टया महत्व लक्षात घेता या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे जाळे तयार केले असून रस्त्यांची दर्जोनोत्ती केली आहे. कोकण रेल्वेची सर्व स्थानके ही अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त करण्यात येणार आहेत. गेल्या दीड वर्षात लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार सर्व कामे मंजूर करण्यात आली आहेत.असेही श्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, महामंडळाच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली असून गतिमान व दर्जेदार काम होण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने पाऊले टाकली आहेत. जिल्ह्यातील होणारी सर्व कामे पारदर्शीपणे होणार आहेत असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0