खोपोली | रेशनिंगच्या तांदळात भेसळ ? गोरगरीब नागरिकांचे आरोग्य धोयात; चौकशीची मागणी

By Raigad Times    20-May-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | सरकारकडून कोरोना काळापासून उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबाला धान्य पुरवठा करण्याची तरतूद केलेली असून, आजतागायत सुरू आहे. हे धान्य नक्की चांगल्या दर्जाचे आहेत का? असा प्रश्न समोर आला आहे. सद्यपरिस्थितीत रेशनिंग दुकानामार्फत मिळणारे तांदुळ पाण्यात स्वच्छ करताना पाण्यावर काही तांदूळ तरंगत असल्याचे समोर आले आहे.
 
हे तांदूळ काही वेळ भिजवल्यानंतरही ते नरम न होता, कठीणच राहत असल्याचे समोर आल्याने यात प्लास्टिक असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे संतापाची लाट पसरली असून चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.सरकारकडून कोरोना काळापासून उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबाला धान्य पुरवठा करण्याची तरतूद केलेली असून, आजतागायत सुरू आहे. हे धान्य नक्की चांगल्या दर्जाचे आहेत का? असा प्रश्न समोर आला आहे.
 
सद्यपरिस्थितीत रेशनिंग दुकानामार्फत मिळणारे तांदुळ पाण्यात स्वच्छ करताना पाण्यावर काही तांदूळ तरंगत असल्याचे समोर आले आहे. हे तांदूळ काही वेळ भिजवल्यानंतरही ते नरम न होता, कठीणच राहत असल्याचे समोर आल्याने यात प्लास्टिक असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे संतापाची लाट पसरली असून चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
 
शासनाकडून मोफत धान्य पुरवठा योजना सुरु आहे. यात तांदळासह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे; मात्र यात मिळणार्‍या वस्तूंचा दर्जा योग्य आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे. महिनाभराचे धान्य घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून ठेवल्यास योग्य प्रकारे ठेवता येतात.
 
यासाठी सावरोलीमध्ये रेशनिंग दुकानावरील मिळालेले तांदूळ पाण्यात स्वच्छ करून ठेवत असताना या तांदळातील काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले आहे. बराच वेळ झाल्यावर हे तांदुळ नरम झाले आहेत का? हे पाहण्यासाठी त्याचा हाताने चुरा करण्याचा प्रयोग केला असता हे तांदूळ न फूटता हातातून निसटत असल्याचे समोर आले आहे.
 
त्यामुळे या तांदळांमध्ये प्लास्टिक तांदूळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी पुरवठा शाखेमार्फत तपासणीचे आदेश देऊन या होणार्‍या फसवणुकीपासून गोरगरीब जनतेला योग्य दर्जाचे धान्य द्यावेत, अशी मागणी सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे आता पुरवठा शाखा विभाग काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
रेशनिंग दुकानावर मिळणारे मोफत धान्य कोणत्या दर्जाचे आहे, हे पुरवठा शाखेमार्फत तपासणी होणे गरजेचे आहे.नुकतीच तांदळातील भेसळ समोर आली आहे. खरंच प्लास्टिक तांदूळ असतील तर ते शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे याची प्रशासनाने सखोल चौकशी करून कारवाई करावी.- संतोष बैलमारे,सरपंच, सावरोली ग्रामपंचायत
पाण्यात भिजत ठेवलेले तांदूळ काही वेळाने नरम होत असतात. मात्र रेशनिंग दुकानातून आणलेल्या तांदळापैंकी काही तांदूळ चक्क पाण्यावर तरंगत होते. त्यामुळे आश्चर्य वाटले; मात्र तेच तांदूळ हातावर घेऊन चुरा करण्याचा प्रयत्न केला असता तांदूळ हातातून सटकत होते. त्यामुळे या तांदळात भेसळ असल्याची भीती आहे. या मोफत मिळणार्‍या तांदळाची चौकशी करून कार्यवाही व्हावी. नाहीतर शासनाची गरीब कुटुंबांना मदत आरोग्याला हानिकार ठरेल.- आशा खोपकर सामाजिक कार्यकर्त्या, खालापूर