बेवारस बॅगेत सापडला पावणेचार लाखांचा ऐवज , माणगांव पोलिसांनी ऐवज केला मूळ मालकाच्या स्वाधीन

27 May 2024 16:49:53
 mangoan
 
माणगांव | म्हसळा येथील प्रवाशाची विसरुन गेलेली बॅग माणगाव पोलिसांनी त्या प्रवाशाला परत केली आहे. या बॅगेमध्ये सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज होता.याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.२४ मे रोजी रात्री गस्त घालत असताना पोलीस शिपाई बोरकर व पवार यांना माणगाव एसटी स्टँडसमोर बेवारस बॅग दिसून आली.
 
त्या बॅगेची पोलीस स्टेशनमध्ये आणून झडती घेतली असता आतमध्ये ५० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही सोन्याचे दागिणे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.माणगावचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांना सदर बॅगच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता,म्हसळा येथील प्रमोद चरण मोहिते यांची ती बॅग असल्याचे समोर आले.
 
सरवर येथे ते त्याच्या नातेवाईकांच्या अंत्ययात्रेसाठी आले होते.२४ मे रोजी रात्री मुंबई ते माणगाव प्रवास करीत असताना गडबडीत ते बॅग विसरून तसेच दुसर्‍या खाजगी गाडीने निघून म्हसळा येथे निघून गेले.त्यांचा शोध घेवून त्यांना माणगांव पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांचा सर्व मुद्देमाला ताब्यात देण्यात आली.या बॅगेमध्ये पावणेचार लाख रुपयांचा ऐवज होता. आपली बॅग परत मिळाल्याने मोहिते यांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0