पनवेल | थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत,
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जेष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांनी त्यांच्या पवीत्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगतसाहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला.
शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले.अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. ८४ गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. स्वर्गीय जनार्दन भगत
यांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. त्यांची मंगळवारी पुण्यतिथी होती.