उरण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

10 Jun 2024 18:08:21
 uran
 
उरण | उरण तालुयात ग्रामीण भागात व उरण शहरातील भागात मोकाट भटकणार्‍या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या
कुत्र्यामुळे उरण मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत जाणारे मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे कर्मचारी कामगारांवर ही मोकाट कुत्रे हल्ले करत असल्याने उरण तालुयातील ग्रामीण भागात व उरण शहरात प्रवास करणे आता धोयाचे झाले आहे.
 
अनेक ठिकाणी नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.उरण नगरपरिषद हद्दीमध्ये नगर परिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.उरण नगर परिषद हद्दीतील वीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी एका व्यक्तीला हातावर चावून जखमी केले होते.
 
जखमी व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. मात्र नगर परिषदेने या महत्त्वाच्या समस्या कडे दुर्लक्ष केल्याने सदर मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उरण नगर परिषदेने सक्षम यंत्रणा राबून निर्मिती करण्याची प्रक्रिया राबवावी व भटया कुत्र्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉटर राजेंद्र इटकरे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
Powered By Sangraha 9.0