गुरे, घोडे रस्त्यावर सोडून, मालक मोकाट,शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचेही दुर्लशक्ष

By Raigad Times    26-Jun-2024
Total Views |
 pali
 
सुधागड । मोकाट गुरांमुळे रस्त्यावर अनेकदा खोळंबा होता. नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागता. खरे तर, गुरं म्हणजे मुकं जनावर. त्याला मानसासारखी अक्कल थोडीच? मात्र या गुरांचा वापर करुन, त्यांची काळजी घेण्याऐवजी रस्त्यावर सोडून, मोकाट तर त्यांचे मालक होत असतात.
 
त्यामुळे या मालकांवरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे.अलिबाग, पाली बाजारपेठ, बल्लाळेश्वर मंदिर परिसर, पोलीस स्थानक, तहसील कार्यालय अशा विविध ठिकाणी झुंडीने फिरत असतात. अलिबाग, पालीसारख्या ठिकाणी अनेक भाविक येत असतात. पर्यटक येत असतात.
 
मात्र रस्त्यावर फिरणार्‍या गुरांमुळे वाहतूक कोंडी होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघालाही निमंत्रण मिळते.अशा गुरांमुळे किंवा घोड्यामुळे बर्‍याचवेळा अपघात होतात. महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांना रस्त्यावरून कठिण होऊन जाते. कधीतरी ही जनावरे रस्त्यावरच उधळताना दिसतात.
 
एखाद दिवस मोठी दुर्घटना होण्याची भिती आहे. गुरेपालक आपली गुरे (जनावरे) चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. बर्‍याच वेळा ही मोकाट गुरे उकिरड्यावर, प्लास्टिक पिशवीत टाकलेले अन्न पदार्थ पिशवीसह खातात.परिणामी बहुतांश गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लस्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत.
 
मात्र त्यांच्या मालकांना याचे सोयरेसुतक नसते. गुरांचा वापर करायचा, घोडा असेल तर किनार्‍यावर त्याच्यामार्फत पैसे कमवून घ्यायचे आणि त्यांना चारा द्यायची, सांभाळायची वेळ आणि की रस्त्यावर सोडून आपण मोकळे व्हायचे.
त्यामुळे यापुढे जे कोणी आपली गुरे, घोडे रस्त्यावर मोकाट सोडतील त्या मालकांवरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.