रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू याची आत्महत्या

By Raigad Times    16-Jul-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुधागड पाली तालुयातील घोटवडे या आपल्या गावी गेला असताना त्याने तिथेच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
 
मागील काही दिवसांपासून तो वैद्यकीय रजेवर होता. राहुल याने आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा? याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. उमदे व्यक्तिमत्व असलेला राहुल सध्या अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होता.
 
काही दिवस तो सुधागड पाली तालुयातील घोटवडे या आपल्या गावी गेला असताना त्याने तिथेच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. दरम्यान, राहुल हा कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुरक्षेसाठी काही काळ त्यांच्यासोबत होता. राहुलच्या या टोकाच्या निर्णयाने लाड यांनाही धक्का बसला आहे.