रायगडसाठी ५०१ कोटींचा विकास आराखडा मंजूर

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक

By Raigad Times    17-Jul-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४ २५ च्या रुपये ४३२ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत २८ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४१ कोटी ६१ लक्ष अशा एकूण ५०१कोटी६१ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक मंगळवारी (१६ जुलै) पार पडली.
 
यावेळी खासदार सुनिल तटकरे, आ. रविंद्र पाटील, आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते. सुविचार सन २०२४-२५ साठी सर्व यंत्रणांकडून आलेल्या मागणीनुसार प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे.
 
नियोजन विभागाने रायगड जिल्ह्याला दिलेल्या वित्तीय मर्यादनुसार जिल्हा नियोजन समितीने रु.५०१.६१ कोटीच्या आराखड्यास मान्यता दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या ४३२ कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. अनुसुचित जाती उपयोजनेच्या २८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
 
तसेच आदिवासी उपयोजनेच्या ४१.६१ कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. सन २०२४-२५ साठी या तिन्ही योजनांचा मिळून रु.५०१.६१ कोटीच्या आराखड्यास समितीने मान्यता दिली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ सर्वसाधारणसाठी अर्थसंकल्पिय तरतूद ३६० कोटी, तरतूद मंजूर करण्यात आली असून रु.३६०.०० कोटी इतका निधी प्राप्त झाला होता. या प्राप्त निधीपैकी जून २०२४ अखेर २०२.९७ कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी ५६.४ टक्के इतकी आहे.
 
सन २०२३-२४ मध्ये नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत रु.५५.४६ लक्षची तीन कामे मंजूर करण्यात आली असून रु. ५५.४६ लक्ष निधी वितरीत करण्यात आला होता. जून २०२४ अखेर रु.५५.४६ लक्ष प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या ४३२ कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता दिली.
 
अनुसुचित जाती उपयोजनेच्या २८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच आदिवासी उपयोजनेच्या ४१.६१ कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. सन २०२४-२५ साठी या तिन्ही योजनांचा मिळुन रु.५०१.६१ कोटीच्या आराखड्यास समितीने मान्यता दिली. सन २०२३-२४ मध्ये यंत्रणांच्या मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत रु.५२.२९ कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले.
 
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत रु.०.६४ कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत ६.९७ कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले, असे ५९.९० कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले आहे.एकूण ५९.९० कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले आह
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. गेल्यावर्षी ३६० कोटींचा असणारा आराखडा सन २०२४ २५ साठी ४३२ कोटींचा केला आहे. विकासात्मक कामाला शासनाने अतिरिक्त ७२ कोटी निधी वाढवून दिला आहे. - उदय सामंत, पालकमंत्री, रायगड
प्रमुख अधिकार्‍यांची गैरहजरी; खा. सुनील तटकरे संतापले...
अलिबाग | रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीत विभागीय आयुक्त विभागाचे तसेच निर्णय क्षमता असणारे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची नाराजी खासदार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवली आहे. त्यानंतर, जे अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे याना दिले आहेत.
 
दरम्यान, केलेल्या विकास कामांचा निधी वर्ग करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येते असा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी केला आणि अधिकार्‍यांमध्ये चलबिचल सुरु झाली. यावर जिल्हा नियोजन अधिकरी मेहेत्रे यांनी असे काही होत नसल्याचे स्पष्ट केले मात्र यावर तटकरे यांचे समाधान झाले नाही.
 
तर मग पैसे वर्ग का केले नाही असे तटकरे यांनी विचारत, मला जिल्हाधिकारी यांच्या नावाने पत्र देऊन त्यात प्रमा कधी आले, निधी कधी आले याचा उल्लेख करा. अधिवेशनात याबाबत बोलेल असे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.