चल ग सखे पंढरीला...! आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

By Raigad Times    17-Jul-2024
Total Views |
palkhi news
 
संपूर्ण महाराष्ट्राला ज्या परंपरेने एकत्र बांधून आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात.पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा आज बुधवार ( १७ जुलै ) पार पडणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी होत असते आज सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्लाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात याच विठ्ल भक्तामुळे चंद्रभागाची तरी फुलून आली आहे. एका वेगळ्याच भक्तीरसात पंढरपूर नाहून निघाली आहे पंढरीनगरी असाच स्वरूपात " रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी" असा आनंद पंढरपुरात गेलेल्या भाविकांना मिळाल आहे.
 
पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. संतांच्या पालखी सोबत सुरु झालेला हा 20 दिवसांची वारी ही आजच्या दिवशी विठुरायाचे दर्शन घेऊन पूर्ण होत असते. हजारो वर्षांपासून चालत आणलेली ही वारीची परंपरा अख्या महाराष्ट्राला भक्ती माळेत बांधून घेत असते.