नवी मुंबई विमानतळ धावपट्टीवरुन धावले विमान! एअरपोर्ट अथॉरिटीकडून सिग्नल यंत्रणेची चाचणी

By Raigad Times    18-Jul-2024
Total Views |
 navi mumbai
 
पनवेल । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर बुधवारी (17 जुलै) विमान उतरताना...उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही ना, याची प्रथम चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाने ही चाचणी घेतली. ही चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली.
 
navi mumbai
 
विमान पाहण्यासाठी अनेकांनी छोटे कॅमेरे व मोबाईल कॅमेर्‍याने फोटो व शुटिंग करण्यासाठी झुंबड उडाली.मोलमजुरी करणार्‍या महिलांमध्येदेखील विमान पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांनी आयुष्यात प्रथमच विमान पाहिल्याचा आनंद चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.विमान आपल्याजवळ आल्याचे पाहताच सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले. या चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार आहे.