'माझा लाडका भाऊ' योजनेची घोषणा ! तरुणांना प्रतिमहिना मिळणार १० हजार रु.

By Raigad Times    18-Jul-2024
Total Views |
 EKNATH
 
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल. तसेच या तरुणांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून 6 हजार ते 10 रुपये देखील जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. पण या योजनेवरुन विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात होती. फक्त लाडकी बहीण योजनाच का? महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना का आणली नाही? सरकार असा भेदभाव का करत आहे? असे अनेक सवाल विरोधकांकडून केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रश्नांना अखेर उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे.