मुंबईतील रीलस्टारचा माणगावजवळ ३०० फूट दरीत पडून मृत्यू

By Raigad Times    19-Jul-2024
Total Views |
 aanvi
 
सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याची अनेकांना लालसा असते. हे रिल्स जीवघेणे ठरत असतानाही अनेकजण रिल्स किंवा फोटोसाठी नको तितके धाडस करतात आणि जीव गमावतात. प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर अन्वी कामदार या २७ वर्षीय मुलीचा अशाच एका दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
अन्वी कामदारने जगभर फिरून अनेक ट्रव्हल व्हिडीओ तयार केलेले आहेत. पर्यटकांना चांगली स्थळं, हॉटेल्स आणि समुद्रकिनारे दाखविण्यासाठी ती रिल्स बनवत असे. मुळची मुंबईची असलेली अन्वी कामदार व्यवसायाने सीए होती. इन्स्टाग्रामवर, ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ती प्रसिद्ध असून तिच्या या इन्स्टा अकाऊंटला अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स होते. सध्या पावसाचे दिवस असून अनेकांना निर्सगाच्या कुशीत किंवा धबधब्याजवळ व्हिडीओ करायचे असतात.
 
अन्वी कामदारही आपल्या एका सहकाऱ्यासह रायगडच्या माणगाव येथे कुंभे धबधब्याजवळ पर्यटनासाठी आली होती. कुंभे धबधब्याच्या कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रिल बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करत असताना काळजी घ्यावी. कडेकपाऱ्यात, धबधब्याखाली जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात असतानाही रिल्स आणि फोटोसाठी काही युवक नको ते धाडस करून जीव गमावतात.