भिसे खिंडीत दरड कोसळली; काही वेळ वाहतूक धीम्या गतीने

20 Jul 2024 17:00:55
nagothna
 
नागोठणे : दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे - रोहा मार्गावरील भिसे खिंडीमध्ये आज (२० जुलै) पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने पहाटेच्या वेळेत या मार्गावर वाहतूक कमी असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रोहा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक देविदास मुपडे व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले व तात्काळ दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. दरड कोसळली ते घटनास्थळ रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असले तरी घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश लांगी व गंगाराम ढुमणे यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्यात सहभाग घेतला
Powered By Sangraha 9.0