मोठा अनर्थ टळला । कर्जत-खोपोली लोकलचा ब्रेकच लागला नाही अन्...

रेल्वे गेली फलाटाच्या पुढे; प्रवाशांची तारांबळ

By Raigad Times    23-Jul-2024
Total Views |
KHOPOLI
 
खोपोली । कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरून जाणारी ट्रेन केळवली स्थानकावर आली असता या ट्रेनचा ब्रेकच लागला नाही आणि ट्रेनचे दोन डब्बे पुढे गेले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. काहींनी चालू ट्रेनमधून झटापट उतरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हे प्रवासी सुखरुप वाचले आणि प्रत्यक्षदर्शींनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 
दररोज शेकडो प्रवासी खोपोली व कर्जत मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात, परंतु 22 जुलै रोजी सकाळी कर्जतवरून 10.40 ला खोपोलीकडे सुटणारी रेल्वे ही केळवली रेल्वे स्थानकात सुटणारी रेल्वे केळवली स्थानकात 10.52 ला आली असता या रेल्वेचा ब्रेक न लागल्याने रेल्वेचे दोन डब्बे स्थानक सोडून पुढे गेले.
 
यावेळी फलाटावर अनेक प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते. परंतु ट्रेन रेल्वे स्थानकात आली असता ट्रेनमध्ये चढण्याच्या तयारीत सर्व प्रवासी असताना, रेल्वेचा ब्रेक न लागल्याने सर्व प्रवासी हैराण झाले होते. रेल्वेचे दोन डब्बे रेल्वे स्थानक सोडून पुढे गेल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. सुदैवाने मोठी हानी झाली नाही आणि प्रवाशांनी निःश्वास सोडला.