बनावट सोने ठेवून घेतले ७२ लाखांचे कर्ज

महिलेने सहा बँकांना, पतसंस्थेला गंडवले!

By Raigad Times    24-Jul-2024
Total Views |
 gold 1
 
पनवेल | बनाबट सोने तारण ठेवून पनवेल येथील महिलेने चक्क सहा बँका, एक पतसंस्था आणि सोने सराफाला ७२ लाख रुपयांना गंडवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. मित्र, मैत्रिणी आणि कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या नावे विविध बँकांतून एका महिलेले हे कर्ज घेतले आहे. याप्रकरणी वैशाली कोळी हिच्याविरोधात खांदेेशर पोलीस ठाण्यात आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाला आहे.
फेडरर बँकेने काही महिन्यांपूर्वी रवी कृष्णा खुटले याला बोलावून बनावट सोन्यासंदर्भात माहिती देऊन बँकेच्या कर्जाची पूर्ण परतफेड करण्यास सुचविले होते. परंतु, रवीने वैशाली कोळीकडील नोकरी सोडल्याने त्याने ही माहिती तिला फोनवरुन दिली. दरम्यान, फेडरल बँकेने खांदेेशर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत पाटील यांनी रवी खुटले याला चौकशीसाठी बोलावले होते
वैशाली कोळीने मुंबई भुलेेशर येथील एका ज्वेलरी आर्ट मालकासोबत संगनमत केले होते. त्याच्याकडून ती काही कामगारांना पाठवून बनावट सोन्याचे दागिने विकत आणत होती. ते दागिने विविध बँकांमध्ये ठेवून कर्जावर रकमेची उचल घेत होती. याकरिता रवीला वैशालीने जमिनीच्या व्यवहारात दोन टक्केचे आमिष आणि पगार देण्याचे कबुली केले होते. अशाच पद्धतीने अनेकांना तिने मदतीचे, नोकरीचे ओशासन देऊन जाळ्यात ओढले होते.
वैशाली कोळी हिच्यासाठी रवी खुटले व अन्य सहकार्‍यांनी डीसीबी बँक (१ लाख ४१ हजार), फेडरल बँक (१ लाख ६७ हजार), आयडीबीआय बँक (२ लाख ८० हजार), स्टेट बँक ऑफ इंडिया (३ लाख १० हजार), बँक ऑफ इंडिया (३ लाख ७५ हजार), केशव स्मृतीपतपेढी (२ लाख १० हजार), आयसीसीआय बँक (३ लाख १५ हजार), आयसीसीआय बँक (२ लाख ६४ हजार), आयडीबीआय बँक (२ लाख ९० हजार), फेडरल बँक (२ लाख ६६ हजार), बँक ऑफ इंडिया (३ लाख ), बांठीया ज्वेलर्स (३ लाख ४५ हजार), आंबिका ज्वेलर्स (१ लाख ८० हजार) आदी बँक, पतपेढी आणि ज्वेलर्समध्ये बनावट सोनें ठेवून त्यांच्या नावाने कर्ज उचलले आहे. हे कर्ज तिने बँक खात्यावरून तिच्या खात्यात वर्ग केले आहे. तर काही जणांकडून रोकड घेतली आहे.
रवी खुटले याच्या नावाने विविध बँकांतून ३४ लाख ४३ हजार, किंजल प्रकाश नगरकर यांच्या नावे १७ लाख ४३ हजार, रिंकू गुलाबसिंग (५ लाख ९७ हजार), सुमनजीत कौर रेहाना (४ लाख ९१ हजार), मीना मारुती मेहत्रे (६ लाख ८८ हजार), संकेत बाळकृष्ण भोसले (२ लाख ६५ हजार) असे ७२ लाख ७६ हजार रुपयांचे बनावट सोन्यावर तारण कर्जाची उचल करून बँकांना चुना लावला आहे. दरम्यान, वैशाली कोळीप्रकरणी ७२ लाख ६७ हजार रुपयांचे बनावट सोने तारण कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये वैशालीसोबत संजय विचारे नावाचा मुंबईतील सराफ सामील आहे. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. आरोपींना लवकरच अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाईल अशी माहिती पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२ चे विवेक पानसरे यांनी दिली.