आरसीएफकडून नोकर भरतीबाबत तरुणांना मार्गदर्शन शिबीर

By Raigad Times    24-Jul-2024
Total Views |
 
alibag
 
अलिबाग | आरसीएफमधील नियोजित कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाईन परीक्षेसंबंधी रायगड जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी ‘भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम २६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता आरसीएफ सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेसशेजारी सरखेल कान्होजी आंग्रेनगर (आरसीएफ वसाहत), कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
आरसीएफमधील विविध विभागांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या रायगड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आरसीएफ लिमिटेड, थळ युनिटतर्फे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात संबंधित विषयांचे तज्ञ उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदरच्या भरती संबंधीत मार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक उमेदवारांना त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या इ-मेल आयडीवर कळविण्यात आले आहे. संबंधीत उमेदवारांनी सदरच्या ईमेल ची प्रत (हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी) तसेच आधार कार्ड (प्राधान्याने)/पॅन कार्ड/ड्रायविंग लायसेन्सची छायाप्रत आरसीएफच्या कुरुळ वसाहतीमधील सभागृहात उपस्थित रहावे आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उप महा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी केले आहे