सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली!

25 Jul 2024 13:57:13
 
MHAD
 
महाड। गेल्या 24 तासापासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजून नागरिकांना सतर्क केले आहे. सद्यस्थितीमध्ये महिकावती मंदिराजवळ नदीची पाण्याची पातळी 6.70 मीटर पेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे. यामुळे सर्व महाडकर नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नगरपरिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
 
महाड शहरात गेल्या 24 तासात महाबळेश्वर पोलादपूर येथे पडलेल्या पावसामुळे शहराच्या सखल भागात दस्तुरी नाका सुकट गली मध्ये सावित्री नदीचे पाणी शिरले आहे. तर, महाबळेश्वर येथे गेल्या 24 तासात 355 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Powered By Sangraha 9.0