प्रवांशाचा जीव धोक्यात घालून एसटी वाहन चालकाची स्टंटबाजी

By Raigad Times    25-Jul-2024
Total Views |
b
 
पाली/बेणसे | येथील भेरव अंबा नदी पुलावरून पाणी जात असतानासुद्धा प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी पुढे नेण्यात आली . ही बस पाली स्थानकावरून बुधवारी (दि. 24जुलै ) सकाळी पावणे अकरा वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेण कडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली होती.
 
मुसळधार पाऊस सुरु असताना अंबा नदीने रुद्ररूप धारण केले असताना भेरव गावाजवळील अंबा नदीपुलावरून पाणी जात होत. अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकाने स्वतःचा व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली.
“अशाअशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे खूप निंदनीय आहे. त्यामुळे संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांचे निलंबन न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.                                                     
-अमित गायकवाड