अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजावरील खलाशांचे सेस्क्यू, १४ खलाशांची सुटका

26 Jul 2024 13:32:23
 alibag
 
अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजासाठी शुक्रवारी सकाळी रेस्कू ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर ८ कर्मचाऱ्यांनाची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने अलिबाग किनाऱ्यावर सोडण्यात आले. या जहाजावर १४ कर्मचारी असून इतर कर्मचारी सुरक्षित आहे.
लाटांचा मारा सहन करीत गेल्या 24 तासांपासून हे जहाज कुलाबा किल्ला लगत अलिबाग येथील तुषार सरकारी विश्रामगृहासमोर अडकून बसले होते. जे एस डब्ल्यू या कंपनीचे हे जहाज आहे. जहाजातील आठ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.
24 तासांपासून जहाज अडकले
प्रवासी जहाज आणि बोटींना समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी समुद्र खवळला असताना बंदी करण्यात आली आहे. फक्त व्यापारी तसेच मालवाहू जहाजे बार्जेस आणि बोटी या जलवाहतुकीला पूर्ण परवानगी आहे. मात्र गुरुवारी सकाळी हे जहाज लाटांसोबत कुलाबा किल्ल्याच्या अगदी पाचशे मीटर अंतरापर्यंत उथळ समुद्रात येऊन रुतले आहे. त्यामुळे या जहाजाची हालचाल बंद झाली.
लाटांचा मारा सहन करीत गेल्या 24 तासांपासून हे जहाज कुलाबा किल्ला लगत अलिबाग येथील तुषार सरकारी विश्रामगृहासमोर अडकून बसले होते. जे एस डब्ल्यू या कंपनीचे हे जहाज आहे. त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने रेस्क्यू शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन राबवले. त्यानंतर आठ कर्मचाऱ्यांची सुटका झाली.
जेएसडब्लू कंपनीचे अधिकाऱ्यांनी या अडकलेल्या जहाजाची पाहणी केली. त्यानंतर हे जहाज पुन्हा खोल समुद्रात ओढून घेण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावे लागतील, याबाबत चर्चा केली. जहाजावरील आठ कर्मचारी सुखरुप परतले आहे. 
Powered By Sangraha 9.0