उरण | उरण शहरातील एन आय स्कूल जवळील घरात राहाणाऱ्या यशश्री शिंदे या २२ वर्षाच्या मुलीची कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.सदर मूलीच्या हत्येची माहिती शनिवारी ( दि२७ ) पहाटेच्या सुमारास उरण पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मूलीचा विच्छिन्न अवस्थेतील मुत्यूदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्ट माटम साठी नेण्यात आला असून सदर मूलीच्या नातेवाईक मंडळीला घटनेची माहिती देण्यात आली आहे.या घटनेसंदर्भात पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपी हा मुस्लिम असून तो बंगलोर या ठिकाणी गेला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.सदर घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उरण तालुक्यात अंमली पदार्थांच्या सेवनाने तरुण पिढी भरकटत चालली आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यातच उरण शहरातील यशश्री शिंदे या २२ वर्षाच्या तरुण मूलीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना शनिवारी ( दि२७) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.या घटनेसंदर्भात सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.या घटनेची माहिती मिळताच उरणचे आमदार महेश बादली, भाजपचे तालुकाध्यक्ष रवि शेठ भोईर, महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी हेमलता पाटील,सिमाताई घरत, शहराध्यक्ष कौशिक शहा,कामगार नेते भूषण पाटील, जितेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष घरत,भावना ताई घाणेकर,माजी नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन यशश्री शिंदेंला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या नातेवाईक मंडळी सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सिमाताई घरत, मूलीच्या नातेवाईक मंडळीनी सदर आरोपींचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली आहे.तर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सदर यशश्री शिंदे हि मूलगी दोन दिवसा पासून बेपत्ता असल्याची माहिती दिली तसेच उरण शहराजवळ तीचा मुत्यूदेह शनिवारी( दि २७) आढळून आला असून आरोपी हा मुस्लिम असल्याचे समजत असून पोलीस सदर आरोपीला लवकरच लवकर ताब्यात घेणार आहेत.तरी नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.