कर्जत भिसेगाव येथे तरुणाचा गळफास

By Raigad Times    27-Jul-2024
Total Views |
 crime
 
कर्जत | कर्जत शहरातील भिसेगाव येथील वेताळ मंदिरासमोरील वडाच्या झाडाला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. हा तरुण नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबतची माहिती येथील पोलीस पाटील यांनी कर्जत पोलिसांना कळविली. शुक्रवारी (२६ जुलै) दुपारी चार वाजता कर्जत पोलीस पोहचले आणि त्यांनी मृतदेह झाडावरुन खाली घेतला.
अमित हेमंत तिवारी असे या तरुणाचे नाव असून तो नाशिक येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.हा तरुण नाशिक येथून कर्जत येथे आत्महत्या करण्यासाठी का आला? या विषयाचा तपास करण्यासाठी कर्जत पोलिसांनी एक टीम तैनात केली असून पोलिसांच्या तपासानंतर त्या तरुणाच्या आत्महत्येचे कारण पुढे येणार आहे. तरुणाच्या मृत्यूबद्दल कर्जत परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण हा परिसर तसा कायम निर्मनुष्य असलेला परिसर आहे. त्यात मुख्य गावापासून अन्य रस्त्याने त्या ठिकाणी जावे लागत असल्याने धार्मिक विधी वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी तेथे सहसा कोणी जात नाही. त्यामुळे त्या तरुणाच्या मृत्यूबद्दल घातपाताची शयता वर्तवली जात आहे.