उरण | उरण येथे २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या. दाऊद शेख नावाच्या तरुणावर संशय असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. तर दोन दिवस उलटून गेले तरी, आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त उरणकरांनी रस्त्यावर उतरत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या घटनेच्या निषेधार्थ उरणमध्ये रविवारी (२८ जुलै) बंदही पाळण्यात आला होता.
उरणमधील येथील यशश्री शिंदे ही २२ वर्षीय तरूणी २५ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. शोध सुरू असतानाच तिचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला. उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपामध्ये तिचा मृतदेह टाकण्यात आला होता. यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर उरणमध्ये खळबळ उडाली होती. त्यातच हत्या होऊन तीन दिवस झाले तरी, मारेकरी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये आगडोंब उसळला होता.
संतापलेले नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. यशश्रीच्या मारेकर्याला अटक करण्यासाठी उरण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करीत, खुनीला त्वरीत अटक करून फाशी देण्याची मागणी आंदोलनकत्यारनी केली आहे. या आंदोलनात उरणमधील सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यशश्री शिंदे ही तरुणी उरणमध्ये तिच्या कुटुंबियांसह राहत होती. तर बेलापूरमध्ये एका कंपनीत कामाला होती. २५ जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली होती, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यशश्री बेपत्ता असल्याची पोलिसांतही तक्रार दाखल केली. पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळीत झाडीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या चेहर्यावर, छातीवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. कुटुंबियांनी या मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. दरम्यान, यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्येीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, तरुणीवर बलात्कार झाला होता की नाही? हे वैद्यकीय चाचणीनंतर समोर येईल. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी
सात पथके तयार केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. यावेळी उरणकर जनतेसोबत माजी आमदार मनोहर भोईर, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, राजेंद्र पाटील, भूषण पाटील, गोपाळ पाटील, नरेश रहालकर, चंद्रकांत घरत, रवी भोईर, राजेश ठाकूर, सुधाकर पाटील, संतोष पवार, सीमा घरत, अफशा मुकरी, हेमलता पाटील, संदीप पाटील, अतुल ठाकूर, गणेश शिंदे, किरीट पाटील आदींसह या परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होता.
दाऊद शेख नावाच्या तरुणावर संशय; पोलीस शोधात
आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयावरही धडक
नागरिकांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार महेश बालदी यांनी सामोरे येत, या घटनेचा निषेध केला. आमदार महेश बालदी यांनी पोलिसांनी जर दोन दिवसांत आरोपीस अटक केली नाही तर शुक्रवारपासून जोपयरत आरोपी सापडत नाही तोपयरत संपूर्ण बाजारपेठ बंद करू असा इशारा दिला. मी तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच मारेकर्याला फाशीची शिक्षा होईपयरत स्वस्थ बसणार नाही, असेही म्हणाले.