मुंबई | राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प आणि सेमीकंडटर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प हे दोन प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली.
यानंतर राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक जारी करत माहिती दिली. राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत आहे. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेट्रील व्हेईकल, सेमीकंडटर चिप, फळांचा पल्प निर्मिती या प्रकल्पांचा समावेश आहे. याप्रकल्पांद्वारे कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे.
त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार तरुणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटलं आहे. कोणत्या प्रकल्पांना मिळाली मंजूरी? जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. यांची लिथियम बॅटरी निर्मितीच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक. हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी, इलेट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मिती प्रकल्प : हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याद्वारे ५ हजार २०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची शयता आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेट्रीक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे. हिंदूस्थान कोका-कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मिती प्रकल्प : हा प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
आरआरपी इलेट्रॉनिस कंपनीमार्फत सेमीकंडटर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील तळोजा, रायगर्डें पुणे तसेच महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडटर निर्मिती करणारा प्रकल्प आहे.
याप्रकल्पामध्ये प्रथम टप्यात १२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार. याद्वारे ४ हजार पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची शयता आहे. दुसर्या टप्यामध्येही १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणार आहे.
आवाडा इलेट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प : हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी अतिरिक्त एमआयडीसी, पनवेलमधील भोकरपाडा एमआयडीसी या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, याद्वारे ८ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.