कर्जत । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी अर्ज भरण्यास कर्जत तालुक्यातील बहिणी तालुक्यातील तलाठी कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्र गर्दीने ओसंडून वाहत आहेत. लाडकी बहिण योजनेसाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना अनुदान दिले जाणार आहे.
या अनुदानासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे गोळा करण्याचे काम महिला वर्गाकडून सुरू आहे. राज्य सरकारने नुकतीच माझी बहीण लाडकी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमध्ये महिलांना महिना 1500 रुपये मासिक अनुदान मिळणार त्यांच्या बँक खात्यावर थेट ही रक्कम जमा होणार आहे.
सदर योजनेचा अर्ज नारी शक्ती दूत या मोबाईल वरील अॅपमधून करता येणार आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला सदरील कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच वय वर्ष 21 ते 65 वय पर्यंत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.