पनवेल | पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईकडे जाणार्या लेनवर ठोंबरेवाडी गावाजवळ आज सकाळी भरधाव मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्यााने रस्त्यााच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात गाडी चालकाचा गंभीररित्याा जखमी होवून मृत्यूा झाला आहे.
तर गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. गाडी चालक विजय पवार (४९ रा.कराड) हे त्याांच्या ताब्यातील मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी ही गाडी घेवून लोणावळा ते पनवेल असा प्रवास करीत होते. शेडुंग टोल नाका ठोंबरेवाडी येथे त्याांच्या गाडीवरील त्याांचा ताबा सुटून रस्त्याावर असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः गंभीररित्याा जखमी होवून मयत झाले आहेत. तर गाडीतील प्रवासी भिकाजी गायकवाड (५८) व संगीता गायकवाड (५४) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.