पोलादपूर क्षेत्रपाल कुडपण रस्त्यावर कोसळली दर

01 Aug 2024 14:21:07
poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर तालुका हा दरडग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. पोलादपूरतालुयातील बहुतांशी गावे डोंगरमाथ्यावर असल्याने येथे जाणार रस्ते डोंगरातून किंवा डोंगर फोडून काढण्यात आले आहेत. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढले की या रस्त्यांवर दरड कोसळण्याचे सत्र सुरु होते.
 
पोलादपूर कुडपण या रस्त्यावर तर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिकच आहे. मंगळवारी (३० जुलै) मध्यरात्रीच्या वेळेस पोलादपूर क्षेत्रपाल कुडपण रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे कुडपणकडून पोलादपूरकडे जाणारी एसटी अडकून पडली. या बसमध्ये सकाळी बसमध्ये प्रवास करणारे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला मिळताच तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबी घटनास्थळी पाठविला व काही तासांतच वाहतूक सुरळीत करण्यात आली
 
Powered By Sangraha 9.0