म्हसळा येथे मुलीवर अत्याचार, १४ वर्षांची मुलगी गर्भवती

By Raigad Times    10-Aug-2024
Total Views |
 mhasla
 
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील पाभरे येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सदर १४ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यामुळे हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी एकाला गजाआड करण्यात आले आहे. पाभरे येथील १४ वर्षीय शाळकरी मुलीला गावातीलच निलेश नावाच्या इसमाने घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
 
याबाबत कोणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली होती. मुलीच्या आईने सदर मुलीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता ती गरोदर असल्याचे समजले.
 
पीडितेने या घटनेची तक्रार म्हसळा पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाभरा येथील निलेश पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी मुगळीकर यांनी भेट देवून माहिती घेतली.