सिंधुदुर्ग : पती-पती वाद; मुलांसह स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न

22 Aug 2024 12:11:05
 alibag
 
सिंधुदूर्ग | पती पतीमधील कौटुंबिक वादातून नवर्‍याने स्वतःसह तीन मुलांवर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री सुारे दहा वाजण्याच्या सुमारास केला. जागरूक नागरिकामुळे त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
 
याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी नवर्‍याला अटक केली आहे. हुसेन रझाक गडीयाली (३७, वर्षे रा. कोकणनगर कोलगाव मुळ जामनगर गुजरात) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स मधील कापड दुकानात घडला. हुसेन गडीयाली याचे बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कपड्याचे दुकान आहे. पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.दररोजप्रमाणे गडीयाली याने आपले दुकान उघडले. त्यावेळी त्याची पती आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली.
 
रात्री हुसेन गडीयाली हे दुकान बंद करण्यासाठी दुकानाचे शटर बंद करीत असताना पत्नी हिने आपण घरी जाणार नाही असा हटट् धरला या कारणावरून दोघांध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी हुसेन गडीयाली याने रागाच्या भरात पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतले. यात एका चार वर्षांच्या मुलाच्या नाक व तोंडात पेट्रोल गेले. या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन गडीयाली याला ताब्यात घेतले. घाबरलेल्या चार वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मुलाच्या तब्येतीत सुधारणा झाली.
Powered By Sangraha 9.0