राज्यात आता लाडका शेतकरी योजना राबवणार

By Raigad Times    22-Aug-2024
Total Views |
 panvel
 
बीड | "लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्रर एकनाथ शिंदे यांनी बीड येथे कृषी महोत्सवात केली आहे. बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. "महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकर्‍यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय.
 
आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकर्‍यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. एवढंच नाही, शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत. मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सुरु केल्या असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.