ग्रंथालय चळवळीची सुरुवात कोकणातून ; अशोक गाडेकर यांचे प्रतिपादन

23 Aug 2024 11:35:40
alibag  
 
म्हसळा | रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमाने व माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या शतकोक्तरी रौप्य महोत्सव साजरा करणार्‍या शेठ करसनदास मुळजी वाचनालय ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रंथालयाचे संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
कार्यशाळा आयोजित स्वागत कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त करताना, कोकणामध्ये मी ९ वर्षे काम केले आहे. त्यामुळे येथील माणस आणि ग्रंथालय मी जवळुन, निरखुन, पारखून पाहिली आहेत. वाचन संस्कृती आणि साहित्य चळवळ ही कोकणची परंपरा आसल्याने ग्रंथालय चळवळीला कोकणातून सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन महारष्ट्र राज्याचे प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय अशोक गाडेकर यांनी केले.
 
कार्यशाळा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, प्र. स.ग्रंथालय संचालिका मुंबई मंजुषा साळवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, आदी उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0