दांडगुरी रस्त्यावरील गतिरोधक घेतोय जीव

By Raigad Times    10-Sep-2024
Total Views |
alibag  
 
दिघी | श्रीवर्धन तालुयातील दांडगुरी येथे टाकलेल्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे ऐन गणेशोत्सवात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना शुक्रवारी (ता. ६) घडली. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे. याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, भोस्ते येथे राहणार्‍या सुनंदा पानवलकर ह्या गुरुवारी आपल्या नातवाला गणेशोत्सवासाठी आणायला वडवली येथे सुनेच्या घरी गेल्या होत्या. मात्र, मुलाला सुट्टी नसल्याने तो नाही आला. त्यानंतर त्या आपल्या मुलासोबत दुचाकी ने परत भोस्ते येथील आपल्या घरी जात होत्या.
 
याबाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार ठरवण्याची मागणी होत आहे. लोकांच्या मागणी नुसार आम्ही तिथे गतिरोधक बसले होते. अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने रंगीत पट्टे बनवले. अधिकचे गतिरोधक आम्ही काढून.
- तुषार लुंगे , उपाभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 
 
दांडगुरी येथे आले असताना तेथील गतिरोधकामुळे पाठीमागून त्यांचा तोल गेला व डोयाला गंभीर मार लागून बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ बोर्लीपंचतन येथील खाजगी दवाखाण्यात नेले मात्र, अधिक उपचारासाठी इतरत्र हलविताना त्यांची प्राणज्योत गेली. या घटनेने सर्वत्र प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी वारंवार अपघाताची भीती प्रवाशांमध्ये कायम आहे. त्यामुळे येथील गतिरोधक हटवण्याची मागणी जनमासातून करण्यात येत आहे. गतिरोधक कुठे असावा याबाबतीत नियमावली आहेत. मात्र, दांडगुरी येथे अधिकच्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार ठरवण्याची मागणी होत आहे.