मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, दुसरा भुयारी मार्ग सुरू

By Raigad Times    13-Sep-2024
Total Views |
 panvel
 
पोलादपूर | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर कशेडी घाटाला दुसरा पर्यायी भुयारी मार्ग लवकरच खुला केला जाईल असे ओशासन दिले होते. त्यानुसार हा दुसरा पर्यायी भुयारी मार्ग गणेशोत्सवापूर्वी सुरू झाल्यामुळे लाखो चाकरमानी आणि वाहन चालकांनी राज्य सरकारला धन्यवाद दिले आहेत. गेल्या १३ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे आणि मजबुतीकरनाचे काम सुरू आहे.
 
राज्यात इतर मोठेमोठे महामार्गाचे प्रकल्प अल्पावधीत पूर्ण झाले मात्र तेरा वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्णच राहिले. अनेक ठेकेदार बदलले, उपठेकेदार बदलले जनतेने आंदोलने केली तरीही मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अद्याप तरी सुटलेला नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून जनतेत तीव्र संताप आणि सरकार विरोधात रोष व्यक्त होत आहे.
 
ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण कामे, त्यामुळे मुंबई गोवा प्रवासाला लागणारा प्रदीर्घकाळ, त्यातच वाहनांची होणारी कोंडी आणि या सर्वांचा चाकरमान्यांना होणारा भयंकर त्रास आता असह्य झाला आहे. गेल्या १३ वर्षात सरकारे आली आणि गेली, अनेक मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आणि हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी एक डेडलाईन देखील जाहीर केली. मात्र नेहमेची येतो पावसाळा त्या उक्तीनुसार दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री महामार्गाचे पाहणी करतात आणि ३१ डिसेंबर पूर्वी रस्त्याचे काम शंभर टक्के पूर्ण केले जाईल असे ओशासन देतात मात्र हे ओशासन अद्याप तरी पूर्ण होऊ शकलेले नाही.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः या महत्त्वाच्या रखडलेला प्रश्नाकडे लक्ष घातले होते. मात्र तरीही हा प्रश्न काही सुटला नाही आणि मुंबई गोवा महामार्गाचे काम अत्यंत कुर्मगतीने सुरू आहे. या सर्वपरिस्थितीला कंटाळून जनतेनेच आता उठाव करायची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात मध्यंतरी आंदोलन केले होते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून जोरदार खडाजंगी झाली होती.
 
त्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून हा रखडलेला प्रकल्प नेहमी चर्चेत असतोच शिवाय त्यावरून राजकीय खडाजंगी देखील होत असते. मुंबई गोवा महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला असून दररोज होत असलेल्या अपघातांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहेया सार्‍या पोर्शभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून दुसर्‍या भुयारी मार्गाचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करून हा भुयारी मार्ग गणेशोत्सवापूर्वी सुरू केलाजाईल असे वचन दिले होते. हा भुयारी मार्ग ३ सप्टेंबर पर्यंत खुला होईल अशी डेडलाईनही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली अर्थात मुख्यमंत्र्यांनी दिलेली डेडलाईन ही डेड झाली असली तरी त्यांनी दिलेला शब्द मात्र पूर्ण झाला आहे. कारण गणेशोत्सवापूर्वी कोकणाकडे जाणारा दुसरा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे लाखो चाकरमान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलादपूर आणि खेड या दोन तालुयांना जोडणार्‍या भुयारी मार्गामुळे कशेडी घाटाचा संपूर्ण प्रवास अवघ्या आठ मिनिटांमध्ये पूर्ण करता येणे शय झाले आहे. सध्या एका भुयारी मार्गातून मोठ्या प्रमाणातून वाहतूक होत असल्यामुळे या भुयारी मार्गात छोटे- मोठे अपघात आहे घडू लागले आहेत.