कर्जतमध्ये पाच दिवसांच्या गौरी गणपतीला भक्तिभावाने निरोप

By Raigad Times    14-Sep-2024
Total Views |
 alibag
 
कर्जत ग्रामीण | गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात आपल्या लाडया गणरायाचे ०७ सप्टेंबर भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन झाले.घराघरात मंगलमय वातावरणामध्ये गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य पसरले होते. अशातच गणरायाच्या पाठोपाठ येणार्‍या गौराईमातेच्या आगमनाची महिला वर्गाला उत्सुकता लागलेली असते.
 
कर्जत तालुयातील शहरात तसेच खेड्यापाड्यात गणराय तसेच दिड दिवसासाठी गौराईमातेचे आगमन होऊन पाच दिवसाचे गणराय गौराईमातेला निरोप देताना अत्यंत दुःखद अंत करणने भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, जयघोष करत निरोप देण्यासाठी गावातील तरुण लहान जेष्ठ मंडळी सर्वांनी सहभाग दाखवला होता. काही दिवसा पासून पडत असलेल्या पावसाने दांडी मारलेल्या पावसामुळे गणेश भक्तांनी आनंद उत्साहाने मिरवणूक काढून पाच दिवसाच्या गणरायाला विसर्जन करण्यात आले.यावेळी आभाळ दाटले होते पाऊसाने दांडी मारल्याने गणेश भक्तत आनंदाचे वातावरण पसरले होते. यावेळी गणेश भक्तांचा उत्साह दिसत होता. मोठ्या भक्तीमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले व गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या भक्ती भावाने गणरायाची आरती करून निरोप देण्यात आला.