माणगांव | माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्गालगत रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या अनमोल आईस्क्रीम कॉर्नर दुकाना जवळ दोन अनोळखी इसमानी चाकूचे वार करून अनोळखी इसमाचा खून केल्याचीघटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ११ सप्टेंबर रोजी अनोळखी मयत व अनोळ- खी दोन आरोपी इसम यांच्यात अनमोल आईस्क्रीम कॉर्नर दुकानासमोर ओट्यावर त्यांचेमध्ये वाद होवून त्याचे रूपांतर मारामारीमध्ये झाले. त्यावेळी आरोपी क्र. १ याने मयत यास कानाखाली मारली त्यावरुन यातील मयत याने त्याचे खीशा- तुन चाकुसारखे धारधार शस्त्र काढून आरोपी क्र. १ यावर हल्ला करुन चाकुसारखे धारधार शस्त्राचे चार केले. त्यावेळी मयत यास आरोपीत क्र. २ यांनी मयत यास आवरण्याचा प्रयत्न करत असताना चाकुसारखे धारधार शस्त्राचे मयत याचे शरीराच्या समोरील बाजुस छातीवर, पोटावर दुखापती झाल्या. तसेच मयत याने स्वताचे डाव्या हाताच्या मनगटावर दुखापती केल्या असताना आरोपी यांनी सदर जखमांमुळे मयत यास मृत्यु येवु शकतो याची जाणिव असताना मयत यास कोणत्याही औषधोपचारीची मदत न देता चाकुसारखे धारधार शस्त्र, चाकुसारखे धारधार शस्त्र पुसलेला कपडा, इतर साहित्य असे घटनास्थळावरुन घेवुन जावुन पुरावा नष्ट केला.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात दाखल झाले करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी माणगांव पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक निवृत्ती बोर्हाडे करीत आहेत.