पनवेल | चहाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून तेथील बिस्किटचे पुडे व गॅस सिलेंडर चोरुन नेल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हिंदालको कंपनीच्या गेट नं.२ जवळ सत्यवान शिंदे यांचे चहाच्या टपरीचे दुकान आहे.
सदर दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दुकानाचा दरवाजा तोडून आतील गॅस सिलेंडर व बिस्किटचे पुडे असा मिळून जवळपास १८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.