महाड | महाडकडून पोलादपूरच्या दिशेने जात असताना एक दुचाकीस्वार उड्डाणपुलावर संरक्षक कठड्याला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. चैतन्य शाम कदम, (वय ३०, रा. सह्याद्रीनगर पोलादपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुारास चैतन्य मोटरसायकल घेऊन महाडकडून पोलादपूरच्या दिशेने जात होता. तो चांढवे गावाच्या हद्दीतील उड्डाण पुलावर आला असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून तो जोरात पूलाच्या डाव्या बाजूकडील संरक्षक कठड्याला धडकला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.