रोहा | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार)पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंचे खांदे समर्थक नंदकुमार म्हात्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी नंदकुमार म्हात्रे यांना कालच्या राष्ट्रवादी स्नेह मेळावाच्या वेळी दिले.
सदर नियुक्ती बाबतीत नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस नंदकुमार म्हात्रे यांच्या सी संपर्क साधला असता ते म्हणाले ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले आहे, या नियुक्तीसाठी शिफारसी महीला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे तर प्रयत्न मा. आमदार अनिकेत तटकरे यांनी केली आहे ते पुढे म्हणाले माझे वर तटकरे परिवाराने दाखवलेल्या विेशासाला तडा जाऊ देणार नाही पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहीन नंदकुमार म्हात्रे यांच्या नियुक्ती ने रायगड जिल्ह्यासह रोहा तालुयात विशेष करून यशवंत खार विभागात नवचैतन्य निर्माण झाला आहे.