मुरुड | मुरुड भोगेश्वर पाखाडीजवळ गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने मुरुड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. या घटनेची उच्चस्तरीय समिती नेून सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनेविरोधात सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. या संदर्भातील माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासून मोर्चाच्या ठिकाणी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी हे स्वतः लक्ष ठेवून होते.
सणासुदीला नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा न काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी मुरुड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षक सोनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले. गौरी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी दोन लहान मुलांकडून जाणीवपूर्वक विसर्जन मिरवणुकीवर दगड फेकले होते. पोलिसांना ही तक्रार घेण्यास २४ तास का लागले? या घटनेची उच्चस्तरीय समिती ने ून सखोल चौकशी करावी, असे विविध मुद्दे निवेदनात म्हटले आहे.