मुंबई | जवळपास दोन महिन्यांपूर्वी दिनेश नावाच्या एका व्यक्तीने टेलेग्रामवरील ग्रुपमधील आकर्षक गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करण्याचे ठरवले होते. दिनेशची रक्कम फॉरेस, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली जाईल असे त्याला ओशासन देण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या दिनेशला जबरदस्त नफ्याची स्वप्ने दाखविण्यात आली होती.
हा पैसा भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचे दिनेशने ठरवले होते. १० दिवसांच्या अंतरात दिनेशने टेलेग्रामवरून आकर्षक परताव्याची आमीषे दाखवणार्यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले. दिनेशने दोन वर्षांची कमाई गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. गुंतवणूक काही दिवसांतच दुप्पट होईल असं त्याला वाटलं होतं. दिनेशला झटपट श्रीमंत होऊ अशी स्वप्ने पडू लागली. या स्वप्नांमुळे त्याला छान जोपत लागत होती.
मात्र एके दिवशी असे काही घटले की त्याची झोपच उडाली आहे. दिनेशने जेव्हा गुंतवणुकीबद्दलचा तपशील विचारला तेव्हा त्याला टेलेग्रामवर ब्लॉक करण्यात आले. दोन वर्ष काबाडकष्ट करून जमा केलेली रक्कम टेलेग्रामवरील झोलर लोकांनी दिलेल्या आकर्षक परताव्याच्या आमीषापोटी गमावली आहे.
दिनेशने या सगळ्या प्रकाराबद्दल बांडवल बाजार नियामकांकडे तक्रार केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. टेलेग्रामचा वापर करून लोकांना कशाप्रकारे गंडा घातला जातोय याचे हे एक उदाहरण आहे. या सगळ्या घोटाळेबाजांची मोडस ऑपरेंडी एकदम साधी आहे. लोकांना जबरदस्त परताव्याची आमीषे दाखवायची. लोकांनी त्याला भुलून पैसे गुंतवले की ते घेऊन गायब व्हायचे. हा प्रकार सध्या सबंध भारतामध्ये जोरात सुरू आहे. हे प्रकार कसे होतात याचा आम्ही मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला ज्या गोष्टी प्रकर्षाने दिसल्या त्या खालीलप्रमाणे आहेत.