आदिवासी म्हणून आमच्यावर काहीही आरोप करू नका! आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी ठणकावले

19 Sep 2024 20:05:28
karjat
 
कर्जत | कर्जत तालुयातील ताडवाडी येथील आदिवासी महिलांना गैरसमजुतीमधून बदनामी करण्याचा कट केला जात आहे. मात्र त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना आम्हाला कोणीही पैसे देण्याचे आमिष दाखवले नव्हते अशी कबुली ताडवाडीमधील महिलांनी दिली. तर आम्ही आदिवासी म्हणून कोणीही आमच्यावर आरोप करू नका, असा इशारा आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी दिला.
 
 
कर्जत तालुयातील पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडी येथील आदिवासी समाजाच्या महिलांनी १५ सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर १६ सप्टेंबर याच महिलांचा आदिवासी नृत्याचा कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होतं. त्यावेळी आदल्या दिवशी पक्ष प्रवेश करायला ठाकरे पक्षाने तुम्हाला काय दिले? असा प्रश्न काहींनी विचारला असता ठाकरे पक्षात प्रवेश करणारी आदिवासी महिला यांनी नितीन सावंत यांनी आम्हाला डिड लाख रुपये बचत गटाला देण्याचे काबुल केले आहे असे सांगितले आणि त्यानंतर शिवसेना पक्षाकडून त्या महिलेची व्हिडीओ व्हायरल करण्यात आली आणि शिवसेना ठाकरे पक्षावर आरोप करण्यात आले.
 
शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी सर्व माध्यमाच्या प्रतिनिधी यांना सोबत घेऊन ताडवाडी गाठले. तेथे ज्या आदिवासीमहिलेने नितीन सावंत हे आमच्याबचत गटाच्या खात्यावर डिड लाख टाकणार आहेत असे जाहीर केले होते. त्याच आदिवासी महिलेने ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तसेच अन्य पदाधिकारी आणि आदिवासी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. तांडवाडीमध्ये त्याच आदिवासी महिलांनी डिड लाख रुप्याबद्दल खुलासा केला.
 
 आम्ही आमच्या स्वखुशीने नितीन सावंत यांच्या कार्यालयात गेलो आणि शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आम्ही हसत हसत बोललेली चर्चा यांची व्हिडिओ बनविण्यात आली आणि त्यानंतर आंचवही बदनामी सुरु झाली. व्हिडिओ बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून नितीन सावंत यांचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधी पक्ष करीत असल्याचे या माध्यमातून पहावयास मिळत आहे.
 
नितीन सावंत हे निष्कलंक व कोणताही डाग नसलेला कार्यकर्ता असल्याने आम्ही आदिवासी त्यांच्या सोबत जात आहोत. तर आम्ही आदिवासी असल्याने आमच्या राजकीय फायद्यासाठी चिखलफेक केली जात आहे हे चुकीचे असल्याचे मत आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी केला आहे. मात्र या प्रकारानंतर आदिवासी कार्यकर्त्यांचे प्रवेश घेताना राजकीयकसरत करावी लागणार असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात निवडणुका येरत असल्याने सर्व पक्ष काळजी घेतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0