अलिबाग | सार्वजनिक बांधकाम मंडळ, रायगड व सार्वजनिक बांधकाम विभागअलिबाग यांच्यावतीने जिल्हा रुग्णालय ब्लड बँक अलिबाग यांच्या सहाय्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून तसेच एक महान कार्याच्याउद्देशाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत तुषार विश्रामगृह सा.बां. विभाग अलिबाग परिसर, जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग शेजारी, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्याकडून करण्यात आले आहे.