अलिबाग | अलिबागच्या समुद्रातील ऐतिहासिक खांदेरी किल्ल्याच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने यासाठी ८ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
खांदेरी किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून यापूर्वीच घोषित केला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेशासाठी नामांकन यादीत नाव देण्यात आले आहे. त्याअनुषंगानेयुनेस्कोच्या तज्ञ पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाची कामे केली जाणार आहेत.