आ.भरत गोगावले यांनी एसटी मंडळ नाकारले एसटी मंडळ नाकारले?

20 Sep 2024 12:59:58
 alibag
 
अलिबाग | शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद गुरुवारी स्वीकारले. दुसरीकडे महाडचे आमदार भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकाण्यास फारसे इच्छूक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मंत्रीपदाचे दावेदार राहिलेल्या आ. गोगावलेंनी २० दिवसांसाठी हा खेळ करु नये, अशी भावना महाडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे.
 
शिंदे गटातील तीन आमदारांची नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. तर महाडचे आमदार यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले आहे. मात्र आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची प्रतिक्रिया आ. गोगावले यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राजकीय संसार थाटल्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्‍या नेत्यांध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे.
 
भरत गोगावले यांनी अनेकदा आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्याचे कामही ते सातत्याने केले. त्यामुळे भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पहिल्या कॅबिनेट विस्तारात त्यांना मंत्री होण्याची संधी होती. मात्र मुंख्यमंत्री शिंदे अडचणीत येत असल्याचे पाहिल्यानंतर.त्यांनी दुसर्‍यांना संधी दिली.
 
त्यांनतर मंत्रिपदाचा योग त्यांना आलाच नाही. त्यांच्या हुकलेल्या मंत्रिपदामुळे ते चेष्ठेचा विषय ठरत आले. आता शेवटचे काही दिवस असताना त्यांना महामंडळ देऊ केल्याने, तो स्वीकारण्यास ते फारसे इच्छुक नसल्याचे समजते. औट घटकेसाठीचे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद, भरतशेट यांनी स्वीकारु नये, असा आग्रह महाड मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गोगावले काय निर्णय घेतात ते लवकरच कळणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0