पेणकरांना हवेत तीन नवीन स्टेशन, रेल्वेचे थांब

20 Sep 2024 13:25:03
pen
 
पेण | पेण तालुक्यात तीन नवीन रेल्वे स्टेशन मंजूर करणे, काही रेल्वे गाड्यांना थांबा देणे तसेच पनवेल-वसई तसेच डहाणू-पनवेल मेू ट्रेनची फेरी पेणपर्यंत वाढविण्यात याव्यात, अशा सूचना रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वेच्या उच्च अधिकार्‍यांना केल्या आहेत. माझं पेण संघटनेचेतर्फे या प्रश्नांचा पाठपुरावा सुरु आहे.
 
यासाठी खा. सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. यानंतर खा.तटकरे आणि रेल्वेच्या उच्चस्तरिय अधिकारी यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खारपाडा, गडब, आमटे येथे नव्याने स्टेशन मंजूर करणे, खारपाड़ा येथे होणारे रेल्वे स्टेशन दुष्मी हद्दीमध्ये करण्यात यावे अशा सूचना खा. तटकरे यांनी रेल्वेचे महाप्रबंधक यांना दिल्या.
 
त्यानुसार रेल्वे प्रशासन अधिकारी या स्थानकांची पहाणी करून पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करतील अशी माहिती रेल्वे महाप्रबंधक यांनी दिली. रेल्वे महाप्रबंधक यांना सर्व समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रस्ताव तयार करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचे निर्देश दिले असून पेणकरांच्या रेल्वे संदर्भातील प्रश्न रेल्वेमंत्र्यांना भेटून मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी खा. तटकरे यांनी दिले.
पनवेल-वसई-पनवेल व पनवेल- डहाणू-पनवेल मेमू ट्रेन या पेण पर्यंत एक्सटेंड करण्यात याव्यात., दिवासावंतवाडी-दिवा या गाडीला पुन्हा एकदा पेण व हमरापूर स्थानकात थांबा मिळावा., मांडवी एक्सप्रेस व, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, या गाड्यांना पेण स्थानकात थांबा मिळावा.
 
दिवा रत्नागिरी गाडीला हमरापूर स्थानकात थांबा मिळावा तसेच प्लॅटर्फॉ वरील फूट ओव्हर ब्रिज प्लॅटर्फॉच्या मध्यावर बांधण्यात यावा, या मागण्या केल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. या बैठकिला माझ पेण संघटनेचे गणेश तांडेल, दिलीप पाटील आणि पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, परशुराम मोकल, सचिन तांबोळी हिरामण गायकर, रवींद्र म्हात्रे, विश्वनाथ बेकावडे, दिलीप पाटील, राजश्री पाटील, गणेश गायकर आदि उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0