पोलादपूर | गणेशोत्सवात भरलेली गावं पुन्हा एकदा रिकामी झाली आहेत. चार दिवसांपूर्वी ज्या घरात आनंदी आणि भक्तीमय वातावरण पहायलस मिळत होते, अशा अनेक घरांना आता टाळे लागल्याचे बघायला मिळत आहे. गणेशोत्सवानंतर चाकरमानी पुन्हा शहरातकडे परतल्यामुळे भरलेले गाव सुनेसूने झाले आहेत.
मुंबई आणि तळकोकण यातील अंतर पाचशे किलोमिटर नसावे, मात्र रोजीरोटीच्या शोधात शहरात गेलेला कोकणी माणूस गावासाठी पाहूणा बनुन राहिलाआहे. गेल्या आठवड्यात गणेशोत्सवानिमित्ता तो गावी आला होता. त्यामुळे गावं पण भरलेली होती. गावात भजने, आरत्या आणि फुगड्यांनी दणाणून गेली होती.
आनंदाचा कुठलाच तोटा या घरांना नसवा असे वरकरणी वाटावे असे चित्र होते. चाकरमानी मुंबईकडे परतू लागले आहेत. कोकणातले मंतरलेले दिवस जसे लवकर आले तसे लवकर संपलेले आहेत. दीड, पाच, सहा, सात दिवसाच्या गणपतींचे विसर्जन झाल्याने मनाला हलकेपणा आला आहे.
गेले आठ दहा दिवस घरे भरल्यासारखी होती. चाकरमान्यांनी गाव फुलले होते. पोर टोरे टवटवीत होती. म्हातारी कोतारी खुशीत होती. सतेज असलेली मंडपी कोमजू लागली. तेवत असलेली समई थरथरू लागली. इतके दिवस आरत्या, भजने आणि फुगड्यानी दणाणून सोडणारी घरे स्तब्ध झाली. चाकरमानी मार्गस्त होत असल्याने गावातील सणासुदीचे उघडणारी घरे ची कवाडे पुन्हा बंद झाली आहेत.