बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावातील तवसाळकर यांच्या घराच्या परिसरात बिबट्या सीसीटिव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. श्रीवर्धनमध्ये अनेकांना बिबट्या पहायला मिळत असल्याची चर्चा पसरली होती. शुक्रवारी, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेळास गावातील धवल तवसाळकर यांच्या घराच्या परिसरामध्ये बिबट्या मुक्तपणे वावरत असताना व्हिडिओ कॅमेर्यामध्ये कैद झाला आह .
घराच्या मागील परिसरामध्ये कुत्रा भुंकत होता. कुत्रा का भुंकतोय, हे पाहण्याकरिता ते घरा मागील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण चेक केले असता, त्यांना बिबट्या आढळून आला. बिबट्याचा गावात मुक्तसंचार असल्याचे समजल्यानंतर नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याची दखल वन विभागाने घ्यावी अशी मागणी धवल तवसाळकर यांनी केली आहे.