ब्लॅकमेल करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार , पोलादपूर येथील धक्कादायक घटना, दोन तरुणांविरुध्द पोक्सो

By Raigad Times    24-Sep-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर दोन वर्षे दोन तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलादपूर तालुक्यातील एका अल्पवयीनमुलीचा फोटो अश्लील पध्दतीने एडिट करुन दोघा तरूणांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०२२ साली सदर तरुणी घरात एकटी असताना, ते तिच्या घरात घुसले आणि दमदाटी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. सुमारे दोन वर्षभर हा अत्याचार सुरु होता.
 
शनिवारी (२१ सप्टेंबर रोजी) पीडित तरुणीने (सध्याचे वय १९) पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.